Friday, 2 October 2015

शेअर मार्केटची भीती घालवा - भाग एक

आताच शेअर मार्केट (निफ्टी) ५०० अंकांनी पडले. २००८ मध्ये अशीच पडझड झाली होती. २७०० पर्यंत गेलेला निफ्टी ९१०० पर्यंत पोहोचला. २००९ साली कॉंग्रेसचे राज्य आले तेव्हा ३७०० वरून ४७०० पर्यंत चाल होती. त्यावेळी आम्हाला ९००० पर्यंत निफ्टी जाईल असे वाटत नव्हते. या वर्षाअखेर निफ्टी  पर्यंत जाईल असे अनेक ब्रोकर्सना वाटते. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्याबरोबर ७२०० पासून ७६०० पर्यंत एका दिवसात व पुढच्या मार्च २०१५ पर्यंत ९१०० पर्यंत निफ्टी वर गेला. एकूण काय मार्केट मध्ये पडझड असतेच. चेंडू वर फेकला तर खाली येतोच व खाली आपटला की वर जातो, तसे मार्केट आहे. जेव्हा जेव्हा मार्केट पडते तेव्हा शेअर्स घ्यायचे व वर गेले की विकायचे. कधीच तोटा होणार नाही.

एक प्रयोग करून पहा. शेअर ट्रेडिंगसाठी Demat आवश्यक. Demat साठी PAN card आवश्यक. Demat काढले की फक्त लेजरमध्ये रु. ११०० ठेवा. स्टेट बँकचा SBIN कोड आहे. या शेअरची रेंज २३०, २५०, २७०, २९० अशी आहे. सध्या आजचा भाव रु. २४९ आहे. आता ३ शेअर घ्या. एक शेअर २७० वर, दुसरा २९० वर व तिसरा ३१० वर विका. चुकून पुन्हा मार्केट खाली आले तर ४था शेअर २३० वर घ्या. तो २५० वर विकायचा आहे. वर्षभरात १०-१२ वेळा २०० ते २५० अंकांनी निफ्टी पडतो किंवा वाढतो. आता ८००० निफ्टी आहे. ८४०० होईल तेव्हा SBIN २७० किंवा पुढे असेल. ८७०० निफित जाईल तेव्हा ३०० च्या पुढे असेल. ९१०० निफ्टी असेल तेव्हा ३५० असेल. अशा शेअरला निफ्टीच्या बरोबर चालणारा शेअर म्हणातात. Android फोनवर ट्रेडिंग करणे अतिशय सोपे आहे. सध्या NSE NOW App शोधा आणि डाऊनलोड करा. NOW ला click केल्यावर Market Data ला click  करा. नंतर Market Watch ला click  करा. नंतर  CNX NIFTY सिलेक्ट करा. तुम्हाला ९.१५ ते ३.३० पर्यंत live भाव दिसतील. SBIN कडे लक्ष ठेवा. SBIN रोज रु. ५-६ ते रु. १०-१२ खालीवर जातो.

टीप: शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही स्वतःच्या जोखीम उचलण्याच्या क्षमतेनुसारच करावी.

No comments:

Post a Comment